वाशी/ प्रतिनिधी-

 छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी या विद्यालयाचे चार विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ 5 वी  चे तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले.

रोहित युवराज येताळ - 242 गुण शहरी विभाग जिल्हयातून - 42 वा , भैरवी परमेश्वर तुंदारे  - 232 गुण शहरी विभाग जिल्हयातून - 53 वी ,  वेदांत वैजीनाथ डुकरे - 214 गुण घेऊन शहरी विभागात जिल्ह्यातून - 214 वा तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ 8 वी एक विद्यार्थी  शिष्यवृत्ती धारक झाला आहे

वैष्णवी परमेश्वर तुंदारे - 206 गुण शहरी विभागातून - 49 वी आली आहे. ए. बी. डोके, जे. के.ठाकर, पी.एच. माने , बी. एम. पवार, व्ही.व्ही, पन्हाळे, एस. व्ही. क्षीरसागर, बी.एम. सावंत, एस.आर.थोरबोले ,एस.एस. धारकर , एस.बी. छबिले यांचे  मार्गदर्शन लाभले.

या विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन सुरेश पाटील , श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संस्थेचे अध्यक्ष बी. वाय. यादव ,उपाध्यक्ष नंदन जगदाळे , जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील , व्हाईस जनरल सेक्रेटरी अरुण देबडवार ,खजिनदार जयकुमारजी शितोळे तसेच इतर ही सदस्यांनी अभिनंदन  केले.  विद्यालयातील शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब चेडे , शिक्षक - पालक संघ उपाध्यक्ष  राहूल कवडे, मुख्याध्यापिका एस. व्ही. गाढवे , पत्रकार, शिक्षण प्रेमी नागरिक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

 
Top