उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 धाराशिव शहरात प्रामुख्याने रविवारी बाजार दिवस असल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात ताजमहल टाकीच्या समोर वाहतूक रहदारी वाढते या ठिकाणी देखील ग्रामीण भागातून व शहरातून बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करावी अशा सूचना दिल्या. तसेच शहरातील चालु असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाबाबत आढावा देखील घेतला या बैठकीत प्रामुख्याने ज्या ठिकाणी या योजनेची कामे चालू आहेत त्या ठिकाणी दिशादर्शक बोर्ड लावावे जेणेकरून या ठिकाणाहून प्रवास करताना कुठलाही अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी व  शहरातील बंद असलेले ट्रॅफिक सिग्नल चालु करावे अशा सुचना संबंधित कंत्राटदार व नगरपालिका विभागास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी  दिल्या.

  दि. 30 जानेवारी 2023 रोजी धाराशिव शहरातील वाढत्या रहदारीच्या बाबत आढावा बैठक खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह, आमदार कैलास पाटील व नंदूभैया राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली.  या बैठकीत प्रामुख्याने शहरात तील बंद पडलेल्या ट्रॅफिक सिग्नल व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला यामध्ये   छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोर्टासमोरील चौक , जिजाऊ चौक, बार्शी नाका,  जुन्या पोलीस स्टेशन समोरील संत गाडगेबाबा महाराज चौक , महात्मा बसवेश्वर चौक इत्यादी ठिकाणी बंद असलेले सिग्नल तात्काळ चालू करावे अशा सूचना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नगरपालिका विभागास दिल्या तसेच शहरातील मंजूर असलेले एकतर्फी मार्गावर वाहतूक व्यवस्था सुरू करावी याबाबत वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्री मस्के यांना सुचित केले. 

 या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. चव्हाण, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी फड मॅडम, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. मस्के, कनिष्ठ अभियंता श्री. काळे व शिवगुंडे, नगरपालिका विभागाचे इलेक्ट्रिक विभागाचे कनिष्ठ अभियंता घाडे व भुयार गटार योजनेचे कंत्राटदार उपस्थित होते. 
Top