उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 आजादी का अमृत मोहोत्सव 2023 निमित्त उस्मानाबाद विभागामधील सर्व डाक कार्यालया अंतर्गत  “सुकन्या समृद्धी योजना खाते” उघडण्याकरिता विशेष अभियान दि. 9 आणि 10 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजीत करण्यात आले आहे.

 पालकांमध्ये बचतीचे महत्व वाढावे तसेच मुलींचे शिक्षण, भवितव्यासाठी ही योजना किती महत्वाची आहे, याबाबत डाक कर्मचारी ग्राम पंचायत, अंगणवाडी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी या विविध घटकांमध्ये या योजनेचे प्रबोधन करून दि. 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी विशेष अभियाना दरम्यान संबधित पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजनेची खाते उघडणार आहेत.

 आठवडी बाजार, मंदिर यात्रा, शाळांमध्ये पालक मेळावे यांच्या माध्यमांतून योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचावी असे प्रयत्न आहेत.

 योजनेची ठळक वैशिष्ठ्य :-

 * फक्त 250 रुपये भरून खाते उघडता येते.

 * खाते उघल्यापासून पुढील 15 वर्षां पर्यंत खात्यात दरमहा बचत करावी लागते. कमीत कमी 250  व जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत एका आर्थिक वर्षात भरणा करता येतो.  

 * मुलगी 18 वर्षांची झाल्यावर, बारावी उत्तीर्ण झाल्यावर किंवा मुलीचे लग्न जमल्यानंतर जमा रकमेतून 50 टक्के रक्कम फक्त मुलीला काढता येते.

 * खात्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खात्यातील एकूण रक्कम (व्याजासहित) काढून ते खाते बंद करता येते.

 आवश्यक कागदपत्रे :-

 * योजनेचा डाक कार्यालयातील विहित नमुन्यातील अर्ज.

 * मुलीचे जन्म प्रमाण पत्र.  

 * मुलीचे आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड व PAN कार्ड

 * मुलीचे व पालकांचे 02 फोटो व रहिवासी पुराव्यासाठी आवश्यक कागद पत्रे इत्यादी.  

 योजनेची सर्व माहिती उस्मानाबाद विभागातील नजीकच्या प्रत्येक डाकघर कार्यालयात उपलब्ध आहे.

  जिल्ह्यातील सर्व डाकघरे आणि शाखा डाकघरे हे जनतेला सेवा देण्यासाठी सदैव अग्रेसर आहेत, तरी सर्व जनतेने आपल्या आर्थिक प्रगतीस हातभार लावण्यासाठी आपल्या मुलीचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी पोस्ट ऑफिस मधील सुकन्या समृद्धी  योजना खात्यामध्ये दि. 9 ते 10 फेब्रुवारी 2023 रोजी  जास्तीत जास्त गुंतवणूक करुन लाभांन्वित व्हावे, असे आवाहन लातूर मुख्यालयातील उस्मानाबाद विभागाचे डाकघर अधीक्षक भगवान नागरगोजे यांनी सर्व जनतेस केले आहे.

 

 
Top