परंडा /प्रतिनिधी - 

 परंडा येथील जिल्हा परिषद प्रशालेचा विदयार्थी बालाजी हनुमंत काळे यांने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या संकल्पनेतून जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या विविध प्रकारच्या स्पर्धा प्रकारात जिल्हास्तरावर उज्वल यश मिळवले बालाजी हनुमंत काळे यांने भालाफेक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला तसेच 1500 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धसाठी प्रज्वल सरवदे व सलमान मुंडे यांनी थाळी फेक व 400 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात भाग घेतला होता.

   या यशाबद्दल प्रशालेच्या वतीने बालाजी काळे, प्रज्वल सरवदे, सलमान मुंडे यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आलमगीर सय्यद मुख्याध्यापक श्री रामचंद्र इंगळे, दिनकर पवार, बबन गवळे, नारायण शिंदे, नामदेव पखाले, सतीश खरात*, *तानाजी मिसाळ, बाबुधी घाडगे, कालिदास झीने भाऊसाहेब सूर्यवंशी, आबासाहेब माळी, मीनाक्षी मुंडे, रेखा उसराटे, चंद्रकांत सुरवसे यांच्यासह विदयार्थी उपस्थित होते.      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव पखाले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री नारायण शिंदे सर यांनी केले.


 
Top