परंडा /प्रतिनिधी - 

प्रहार शिक्षक संघटना उस्मानाबाद जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत यांची संघटनेच्या राज्य सचिव पदी निवड झाल्याने उस्मानाबाद प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पद रिक्त झाले होते.उस्मानाबादच्या नुतन जिल्हाध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी जिल्हा कार्यकारीणीची बैठक घेण्यात आली.सदरील बैठकीत 

विद्यमान जिल्हा कार्यकारिणीत कार्यरत असलेले जिल्हा कार्याध्यक्ष विशाल अंधारे यांचे नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.संघटनेशी असलेली एकनिष्ठा, प्रामाणिकपणा, शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याची जाण आणि शिक्षक, विद्यार्थी व सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभागी होऊन सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहून संघटनेच्या वाढीस उभारी नि बळकटी देण्याचे काम त्यांनी मनापासून केल्याने त्यांची जिल्हाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.तसेच परखड, सत्यवादी नि शैक्षणिक सामाजिक कार्याची आवड व शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने धडपड करणारे शिक्षक मनोज ढगे यांना जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली.

उस्मानाबाद तालुकाध्यक्ष पदी अशोक फेरे यांची निवड करून‌ त्यांनाही निवडीचे पत्र नुतन जिल्हाध्यक्ष विशाल अंधारे यांच्या हस्ते देण्यात आले.

माजी जिल्हाध्यक्ष तथा राज्य सचिव वैजिनाथ सावंत यांनी उस्मानाबादचे नुतन जिल्हाध्यक्ष म्हणून विशाल अंधारे यांच्या नावाची घोषणा केली व लागलीच निवडीचे पत्र देवून स्वतः त्यांना हार घालून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रहार शिक्षक संघटना राज्य कार्याध्यक्ष दत्तात्रय पुरी, राज्य सचिव वैजिनाथ सावंत, जिल्हा सहसचिव संतुक कडमपल्ले, जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग पवार, सचिन अंधारे, भैय्यासाहेब खुणे,बालाजी निंबाळकर,उमेश कुरवलकर, लहू लाड आदि.प्रहार पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राज्य सचिव वैजिनाथ सावंत यांनी तर आभार जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी मानले.

 
Top