तुळजापूर/प्रतिनिधी - 

 तालुक्यातील काक्रंबा गावास नवे कारभारी मिळुन नवे कारभारी सत्ता मिळाल्याचा आनंदात मश्गुल असल्याने काक्रंबा गावात ग्रामस्थांना साध्या   मुलभुत सुविधा नी मिळत नसल्याने नव्या कारभाराच्या कारभारा बाबतीत  ग्रामस्थांन मध्ये नाराजी पसरली आहे नव्या 

तुळजापूर तालुक्यातील दहा हजार लोकवस्तीचे काक्रंबा गाव असुन नवे कारभारी गावाला मिळाल्या पासुन स्वछतेच्या नावाने बोंबाबोबं सुरु आहे हे कमी काय म्हणून गावातील सार्वजनिक पथदिव्याचे एलईडी बल्ब बंद असल्याने सांयकाळ नंतर मुली महिलांना घराबाहेर पडणे भितीचे वाटत आहे.नाल्या पाण्याऐवजी कच-याने भरुनगेल्या असल्याने  सांडपाणी रस्त्यावर येत आहे.यावरुन ग्रामस्थांना मार्गक्रमण करावे लागत आहे 

 नालेसफाई  करुन व बंद असलेले एलईडी बल्ब तात्काळ चालू करण्यात यावे या संदर्भात ञस्त ग्रामस्थांनी  निवेदन देऊन हे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे  अशी  मागणी चे निवेदन  चेतन बंडगर युवासेना दीपक भिसे अहमद अन्सारी सद्दाम  मुलानी नागनाथ खताळ अनिता मस्के पवन वाघमारे

,युवराज भिसे बाबा भिसे सोमनाथ खताळ अदि ग्रामस्थांनी केली आहे.


 
Top