तुळजापूर / प्रतिनिधी-

श्री श्री रविशंकर विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी ईश्वरी गंगणे हिने शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरावर धडक मारली आहे.लातूर येथे झालेल्या विभागीय स्तरावरील 14 वर्ष वयोगटातील सॉफ्ट टेनिस स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकवल्यामुळे कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे . तिला प्रशिक्षक संजय नागरे हेमंत कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशाबद्दल उस्मानाबाद जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष संदीप गंगणे, सचिव शिराज शेख, उपाध्यक्ष अनिल धोत्रे, किरण हंगरगेकर , प्रदीप अमृतराव, राजू गायकवाड, सतीश हुंडेकरी आदींनी अभिनंदन केले.


 
Top