तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील मंदीराकडे जाणाऱ्या  रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे.  नगरपरिषद   पार्किंग ठेकेदाराला  ठेका देवुन मोकळे झाले आहे. पण  वाहतुक कोंडी दूर करण्याबाबतीत  कुठलीही उपाययोजना करण्यास तयार नसल्याने  याचा सर्वाधिक ञास हा  भाविकांन सह शहरवासियांना सह वाहनचालकांना  सहन करावा लागत आहे . 

शहरातील अनेक प्रमुख रस्ते, चौक आणि महत्त्वाच्या गल्ल्यांमध्ये नेहमीच ट्रैफिक जामचा अनुभव येतो. शहरातील  मंदीराकडे येणारे भवानी रोड महाद्वार रोड, शुक्रवार पेठ, पाण्याची टाकी हे प्रमुख  रस्त्यासह मंदीर परिसरात गल्ल्यांतही बारा महिने, चोवीस तास वाहतुकीची कोंडी झालेली दिसते. त्यामुळे हे रस्ते वाहतुकीसाठी आहेत की पार्किंगसाठी, असाच प्रश्न पडतो. 


 
Top