उस्मानाबाद / प्रतिनिधी-

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करावा या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी उस्मानाबाद येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने अक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात महिला शालेय विद्यार्थिनी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चाच्या प्रारंभी लव जिहाद घटना मध्ये वाढ होत असून याबद्दल सर्व नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने याची तीव्रता आणि दुष्परिणाम यावर माहिती देणारे जनजागृती पर मार्गदर्शन करण्यात आले.

राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राष्ट्रमाता जिजाऊ चौकातून निघालेला हा मोर्चा शहरातील बाशी नाका, आरपी काॅलेज , पोस्ट आॉफीस काळामारुती चौक,नेहरु चौक देशपांडे स्टँड, शिवाजी चौक,प्रमुख मार्गावरून निघून जिल्हा अधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना धर्मांतरण आणि लव्ह जिहादविरोधी कायदा व्हावा या मागणीचे निवेदन महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

या मोर्चात महिला महाविद्यालयीन विद्यार्थिनी नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 
Top