उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र पोलिस दिन च्या निमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुलजी कुलकर्णी साहेब यांच्या माध्यमातून जिल्हाभरातील सर्व पोलिस बांधवाना प्रहारच्या वतीने  शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी आदरणीय बच्चू भाऊ यांच्या जीवनावरील आधारित लोकनायक हे पुस्तक देखील देण्यात आले तसेच वाहतूक निरीक्षक म्हस्के साहेब यांना देखील भेटून महाराष्ट्र पोलिस दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी म्हस्के  यांनी आपुलकीने विचारपुस केली एका चांगल्या  व्यक्तिमत्वाला भेटून मनातून आनंद झाला.

यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे ,जिल्हासघटक बाळासाहेब कसबे,उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,जिल्हासचिव महादेव चोपदार,जिल्हाउपाध्यक्ष महेश माळी,शहराध्यक्ष जमीर शेख,अभिजित कसबे,देवेंद्र रसाळ आदी उपस्थित होते. 

 
Top