तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील भातंब्री शिवारातील शेतरस्ता महसूल प्रशासनाने दि 14/01/2020 रोजी शेतरस्ता करून दिलेला शेतरस्ता  गायब केल्याची तक्रार   त्रस्त शेतकऱ्याने  तहसिलदार सौदागर तांदळे यांना निवेदनाद्वारे दिली आहे. 

 तुळजापूर तालुक्यातील भातंब्री ते तिर्थ (खुर्द) येथील गाव जोड रस्ता गट नंबर 183 असून पन्नास ते साठ शेतकरी या रस्त्यावरून वहिवाट करतात मात्र सध्या दोन वर्षापासून संबंधितांनी शेतरस्ता गायब करून ते फक्त कागदोपत्रीच रस्ता राहिला आहे. तरी पुनश्च शेतरस्ता खुला करुन द्यावा, अशी मागणी तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन केली आहे.  या निवेदनावर शिवाजी दांगट सह अन्य पाच सह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top