तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील जळकोट  येथील संजय हरिदास कदम (पाटील ) (वय 45 वर्षे ) यांचे मंगळवार दि.10 रोजी सकाळी 9:00 वाजता बीड जिल्हयातील चौसाळा तालुक्यातील मानेवाडी  गावी चुडे देण्यासाठी गेले असता हृदयविकाराच्या धक्क्याने   निधन झाले. त्यांच्यावर  अंत्यविधी दिनांक 10 जानेवारी 2023 रोजीच दुपारी  3:00 वाजता त्यांच्या मूळ गावी जळकोट (ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद ) येथे सार्वजनिक स्मशानभूमीत करण्यात आले.

 त्यांच्या पश्चात आई, एक मोठा भाऊ, पत्नी, एक मुलगी, दोन मुले, भावजय, पुतणे असा परिवार आहे. जळकोटचे सरपंच अशोकराव पुंडलिकराव कदम ( पाटील ) हे सख्खे चुलत काका आहेत. संजय कदम यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  


 
Top