उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मराठवाड्यातील पहिली निवासी इंग्रजी शाळा असलेल्या उस्मानाबाद येथील तेरणा पब्लिक स्कूलचे (सीबीएसई)  वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व जल्लोषात दि.12  व 13 जानेवारी रोजी पार पडले. यावर्षी शाळेचे सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलन होते. इयत्ता १ ली ते 10 च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतासह विविध गीतावर, विषयावर आपली कला सादर केली. देशभरातील विविध प्रकारच्या आदिवासी समाजातील लोकांचे जीवन, त्यांच्या प्रथा व परंपरा नृत्याच्या व नाटकांच्या माध्यमातून सादर करण्यात आल्या.

       या स्नेहसंमेलनासाठी  प्रमुख पाहुणे म्हणून पहील्या दिवशी प्रसिद्ध व्याख्याते, कवी अनंत विठ्ठल राऊत तर दुसऱ्या दिवशी समाज प्रबोधनकार व्याख्याते वसंत हंकारे हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री एल. एल. पाटील होते. संस्थेचे सचिव अनंतराव उंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी संत गोरोबा काका, राजमाता जिजाऊ व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मानव्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे प्राचार्य यांनी यांनी शाळेने आतापर्यंत विविध क्षेत्रात केलेली कामगिरी व मिळवलेले यश याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.    यावेळी व्याख्याते, कवी अनंत राऊत यांनी स्त्री-पुरुष समानता, स्त्रीभ्रूण हत्या, आईवडीलांची सेवा, मैत्रीचे महत्व, आताच्या काळात मुलांनी कसे वागावे याबद्दल माहिती सांगून छत्रपती शिवाजी महाराज, राजामाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेऊन पालकांनी व विद्यार्थी यांनी वागावे, असे आवाहन केले. तर समाज प्रबोधनकार वसंत हंकारे यांनी आजच्या मातांनी राजमाता जिजाऊ प्रमाणे मुलांवर संस्कार करावेत, आपल्या अपेक्षेचे ओझे मुलावर न लादता त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण घेऊ दया, मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला. दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमाला उपस्थितानी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top