उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सोलापूर-उमरगा हा महामार्ग हा वास्तविक 2016 मध्ये पुर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापपर्यंत या महामार्गाचे काम अपुर्ण असून हा महामार्ग अपुर्ण असल्याने या रस्त्यावर शेकडो नागरिकांचे अपघाताने मृत्यु झालेले आहेत. खासदार या नात्याने हा महामार्ग पुर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी साहेब व संबंधित विभागास वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र या कामात कोणतीही सुधारणा होत नसल्याने मा. जिल्हाधिकारी श्री. सचिन ओम्बासे साहेब व प्रकल्प संचालक श्री. चिटनीस तसेच कंत्राटदार यांच्या समक्ष दि. 14 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून 31 डिसेंबर 2022 पर्यंत जुन्या एसटीपीएल कंपनीकडून सदरील काम काढुन घ्यावे व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कंत्राटदारांकडून करावे ही महत्वाची सुचना केली होती. 31 डिसेंबर 2022 पर्यंत सदरील प्रलंबीत काम चालु होण्याची कार्यवाही न झाल्यास दि. 01 जानेवारी 2023 पासून या महामार्गावरील टोल प्लाझावरील (फुलवाडी व तलमोड) टोल वसुली बंदी केली जाईल असा अल्टीमेटम दिला होता त्यानंतर NHAI कडून व कंत्राटदारांकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे NHAI ने सदरील बैठकीमध्ये देखील आम्ही 31 डिसेंबर पर्यंत या महामार्गाचे काम चालू नाही केल्यास टोल वसूली बंद ठेवू अशी सहमती दिली होती. त्यामुळे गेल्या 17 दिवसांपासून सदरील टोलनाक्यावरील टोलवसूली बंद आहे.

   सतरा दिवसानंतर NHAI व कंत्राटदाराला जाग आली असून त्यांनी काल दि. 17 जानेवारी 2023 रोजी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना विनंती केली की सदरील महामार्गाचे काम चालू आहे व सदरील अपुर्ण कामे ही वेगवेगळ्या ठेकेदाराना विभागुन दिली असून आपण प्रत्यक्ष पाहणी करुन खात्री करावी अशी विनंती केली त्यामुळे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि. 17 जानेवारी 2023 रोजी 1. अणदुर 2. नळदुर्ग बायपास 3. जळकोट 4. आष्टा मोड फाटा 5. येणेगुर 6. मुरुम मोड 7. दाळींब 8. उमरगा चौरस्ता 9. उमरगा बायपास 10. तुरोरी 11. तलमोड या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून कामे चालू झाल्याची खात्री केली.

   या पाहणीमध्ये TMPL कंपनीला किमी 249/000 ते 309/000 किमी आणि b. PBA या कंपनीला किमी 309 ते 349/060 किमी सदरील कंत्राटदार कंपनीमार्फत अपुर्ण कामे चालू असल्याचे दिसून आले मात्र अपुर्ण कामे ही वेळेत पुर्ण होण्यासाठी असलेली यंत्रसामुग्री कमी प्रमाणात असल्याने सध्या कार्यरत असलेल्या यंत्र सामुग्रीवर ही अपुर्ण कामे गतीने पुर्ण होवू शकत नाहीत त्यामुळे संबंधीत कंत्राटधारकांना पुढील तीन दिवसात यंत्रसामुग्री वाढ करुन गतीने काम पुर्ण करण्याच्या दृष्टीने NHAI यांनी कंत्राटदारांना सुचना कराव्यात जेणेकरुन पुर्ण रस्ता नागरिकांना वापरण्यात येईल व अपघात होणार नाहीत व त्यानंतर सदरील महामार्गावरील टोल चालू करण्याच्या संदर्भात भूमीका स्पष्ट करणार असल्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी स्पष्ट केले.

 ज्या ठिकाणी अपुर्ण कामे चालू आहेत त्या ठिकाणी नागरिकांना आवाहन आहे की अपुर्ण कामे पुर्ण करण्यासाठी देखील सहकार्य करावे तसेच या कामाच्या ठिकाणी ही कामे बंद राहील्यास किंवा संथ गतीने चालू असल्यास नागरिक व शिवसैनिकांनी खासदार संपर्क कार्यालयाच्या निदर्शनास आणुन द्यावे व सुचना कराव्यात.

 कामे चालू झाली मात्र अपुर्ण कामे गतीने होणे अपेक्षित त्यानंतरच टोल चालू ठेवणेबाबत भूमीका स्पष्ट करणार

 यावेळी प्रकल्प संचालक, चिटनीस, TMPL कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक b. PBA कंपनीचे श्री. मनोज कुमार, प्रकल्प व्यवस्थापक धर्मेंद्र, कमलाकर चव्हाण, बालकृष्ण घोडके, कृष्णाथ मोरे, संतोष कलशेट्टी, सुरेश वाले, बसवराज वरनाळे, रजाक अत्तार, रणधिर सुर्यवंशी, दगडू पाटील, शहापुरे बाबुराव, रणजित सास्तुरे, प्रशांत नवगिरे,  आदी मान्यवर उपस्थित होते. 

 
Top