नळदुर्ग  / प्रतिनिधी-

 नळदुर्ग नगरपालिकेच्या वतीने दि.२० जानेवारी रोजी मैलारपुर येथील खंडोबा मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी आठ ते दहा या वेळेत राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत पहिल्याच दिवशी  १५ गाड्या कचरा जमा करून तो डम्पिंग ग्राऊंड मध्ये नेण्यात आला.

      नळदुर्ग (मैलारपुर) येथील श्री खंडोबाची यात्रा नुकतीच पार पडली आहे. यावर्षीच्या श्री खंडोबा यात्रेत विक्रमी संख्येने भाविक सहभागी झाले होते. यात्रेनंतर मंदिर परिसरात सर्वत्र मोठयाप्रमानात कचराच कचरा पडला होता. नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी खंडोबा मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय यावेळी त्यांनी या स्वच्छता मोहिमेत शहरांतील नागरीक सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील महिला बचत गटाच्या सदस्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले होते. मात्र या आवाहनाला शहरांतुन म्हणावा तसा प्रतीसाद मिळाला नाही.

       दि.२० जानेवारी रोजी मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचे स्वच्छता विभागातील सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी सकाळी आठ वाजता मैलारपुर येथील खंडोबा मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम सुरू केली. स्वता मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्याने नगरपालिकेचे सर्वच कर्मचारी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.कार्यालयीन अधीक्षक अजय काकडे, दीपक कांबळे, मुनीर शेख,खलील शेख, श्री पुंड, ज्योती बचाटे, शहाजी येडगे पप्पु खारवे, खंडू शिंदे यांच्यासह नगरपालिकेचे स्वच्छता  विभागातील १०० कर्मचारी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.


 
Top