उमरगा/ प्रतिनिधी-
बलसुर शाळेतील बाकड्यावर महापुरुषांबद्दल अपशब्द लिहीण्यात आल्यानंतर युवकांनी शाळा व गाव बंद केले. यानंतर तालुक्यातील युवकांनी दोषीला तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी उमरगा, मुरुम, बलसुर, जकेकुरमध्ये बंद पाळण्यात आला. त्यानंतर उमरगा पोलिसांना निवेदन देऊन दोन समाजात तेढ निर्माण होईल व समाजामध्ये अशांतता निर्माण करणाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करावी. अन्यथा उमरगा लोहारा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
उमरगा तालुक्यातील मौजे बलसुर येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बाकड्यावर एका इसमाने श्री छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल अपशब्द लिहील्यानंतर गावातील युवकांनी शाळा बंद करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने उमरगा पोलिस ठाण्यात जमा झाले. त्यांनी पोलिसांना निवेदन दिले. यामध्ये महापुरुषाघा अवमान करणाऱ्या निच प्रवृत्तीच्या लोकांना पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर अटक करुन त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी. श्री छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल वारंवार अशा प्रकारची विधाने जाणीवपूर्वक केली जात आहेत. ज्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल व समाजामध्ये अशांतता निर्माण होईल. दोन समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या निच औलादींवर तात्काळ कार्यवाही करावी. अन्यथा उमरगा लोहारा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या घटनेनंतर गुरुवारी उमरगा, मुरुम, जकेकुर व बलसुर बंद पाळून या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य संताजी चालुक्य, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब पवार, शहराध्यक्ष मंगेश भोसले, लक्ष्मण शिंदे, महेश पाटील, संदिप बिराजदार, किरण रामतिर्थे, माऊली बिराजदार, महेंद्र पाटील, महेश पाटील, महेश मुर्टे, ज्ञानेश्वर जंगाले, अनिकेत साठे, प्रथमेश पाटील, तुकाराम शिंदे, निरंजन कटके, प्रविण माळी, गोविंद कुंभार, नागेश बनसोडे, किरण पोतदार, परमेश्वर मुर्टे, गणेश वाडीकर, रणजित सुर्यवंशी, गणेश गायकवाड आदीसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.