उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारत निवडणूक आयोगानाने शिक्षक मतदार संघ निवडणूक 2023 चा कार्याक्रम घोषित केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात दि. 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी विविध कायदे, नियम या अन्वये मतदान शांततेत आणि सुव्यस्थीत पार पाडणे याकरीता जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

 उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या देशी, विदेशी, सीएल-3, एफएल-3, एफएल-2, सीएलएफएलटिओडी-3, एफएल-बीआर-2, ताडी अनुज्ञप्त्या खालील प्रमाणे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश डॉ.ओम्बासे यांनी दिले आहेत.

 शनिवार, दि.28 च्या सायंकाळी 4.00 पासून ते सोमवार, दि. 30 जानेवारी 2023 रोजी मतदानाचा संपूर्ण दिवस जिल्ह्यात अनुज्ञप्ती बंद तसेच गुरुवार, दि.02 फेब्रुवारी 2023 रोजी मतमोजणीचा संपूर्ण दिवस अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत. 

 या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधीत अनुज्ञप्ती धारकाविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये कडक कारवाई करण्यात येईल, तसेच ते धारण करीत असलेली अनुज्ञप्ती कामस्वरुपी रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.


 
Top