उस्मानाबाद / प्रतिनिधी

 जिल्हा रुग्णालय, धाराशिव (उस्मानाबाद) येथील सी. टी. स्कॅन मशीन मागील 4 दिवसांपासून नादुरुस्त असल्याने रुग्णांची हेळसांड होत असून रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत तसेच रुग्णांना खाजगी रुग्णालयातून सी. टी. स्कॅन करावा लागत असल्यामुळे रुग्णांचा वेळ खाजगी रुग्णालयामध्ये सी. टी. स्कॅन करण्यास जात आहे. 

तसेच खाजगी रुग्णालय सी. टी. स्कॅन करीता फीस मोठ्या प्रमाणात आकारत असल्यामुळे रुग्णांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक भार पडत असून रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे रुग्ण तसेच नातेवाईकांकडून अनेक तक्रारी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडे प्राप्त झाल्याने रुग्णांची हेळसांड थांबविण्याकरीता जिल्हा शल्य चिकित्सक व अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांना सी. टी. स्कॅन मशीन तात्काळ दुरुस्त करणेबाबत पत्राद्वारे सुचना केल्या आहेत.

 
Top