उस्मानाबाद / प्रतिनिधी

   या वर्षी उद्योगीनी महिला मंडळाचा संक्रांत तिळगुळ समारोह एम आय डी सी येथील लघुउद्योग भारतीच्या एस आर के सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या वर्षीचे प्रमुख आकर्षण होते किशोरी प्रबोधन. संक्रांत,आणि तिळगुळ याचे औचित्य साधून किशोरींना काही गोड शब्दात प्रबोधन करण्यात आले, ते ही अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने. येथे बनवण्यात आलेला सेल्फी पॉइंट हा प्रबोधन करणाऱ्या स्लोगन आणि पतंग याच्या साह्याने बनवण्यात आला होता.येणाऱ्या महिलांनी तिथे काढलेले फोटो आणि त्यासोबत काही नारी, किशोरी प्रबोधनात्मक वाक्ये सर्वदूर पोहोचविण्याचे काम आपोआपच झाले.

मंडळाच्या अध्यक्ष डॉ.सोनाली दीक्षित, सचिव वर्षा नळे, कोषाध्यक्ष आरती अजमेरा

तसेच उद्योगी नी महिला मंडळ सदस्य ,डॉ.अनार साळूंके, संगीता काळे,किरण देशमाने, अनिता शेटे, स्मिता शेटे, सुरेखा होनमुटे, मेघा होनमुटे, निर्मला होनमुटे, पार्वती साळुंके, उज्वला मसलेकर, सुनिता सारडा, सुनीता निंबाळकर, दमयंती साळवी, चैत्राली साळुंके, दिपाली रामढवे, गार्गी जोशी, सुमन नलावडे, धनश्री हिंदाने, कोमल रोहिडा, राधिका गर्जे, नलिनी गर्जे, अपर्णा वाघमारे, प्रतिभा वाघमारे, शीला देशमुख, विजया टेळे, कौशल्या खटिंग, रूपाली गिरी, सरिता बेलुरे, कमल बेलुरे, प्रमिला भडंगे, आदिती जोशी,इत्यादी मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.


 
Top