उस्मानाबाद / प्रतिनिधी

 सोफि हजरत खाँजा शमशोद्दीन गाझी रहे. एक थोर संत होते उस्मानाबाद शहराच्या दक्षिण भागात त्यांचा एक आकर्षक व भव्य मोठा दर्गा आहे. या दर्गाचा दरवर्षी मोठ्या प्रमाणात उर्स साजरा करण्यात येत आहे. या उर्सामध्ये हिंदु, मुसलमान सर्व धर्माचे भाविक लोक मोठ्या उत्साहाने या उर्सामध्ये सहभागी होतात. हे एक एकात्मतेचे प्रतिक आहे. या उर्साची परंपरा ७१८ वर्षा पासुन चालत आलेली आहे. उर्सामध्ये दरवर्षी संदल मिरवणुक, कव्वाली, मुशायरा, शबे गजल, महफिल-एसमा व वाजबयाण इत्तर कार्यक्रमाचा समावेश असतो.

 महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातर्फे साजरा होणाऱ्या दर्गा हजरत खाँजा शमशोद्दीन गाझी रहे.यांच्या वार्षिक उर्स अत्यंत चांगल्या प्रकारे व व्यवस्थित पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती त्यावेळी डॉ.सचिन ओम्बासे बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, न.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी पवार पृथ्वीराज, जिल्हा वक्फ अधिकारी अहेमद खाँन, दर्गा मुतवल्ली सय्यद रफिक, ऊर्स कमिटीचे मेंबर शेख अयाज हरुण, वाजीद पठाण, बीलाल तांबोळी, फिरोज खाँन, ॲड.जावेद काझी तसेच विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 मागील वर्षाप्रमाणे या वर्षी ही पुढील प्रमाणे कार्यक्रम होणार आहेत. या नियोजित कार्यक्रमामध्ये पंखा मिरवणूक शनिवार, दि.04 फेब्रुवारी, सेहरा मिरवणूक रविवार दि.05 फेब्रुवारी, गुसल पाणी मिरवणूक सोमवार दि. 06 फेब्रुवारी रोजी हे कार्यक्रम संध्याकाळी 7.00 ते रात्री 9.00 पर्यंत होणार आहेत. संदल मिरवणूक मंगळवार दि.7 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत, चिरागा कार्यक्रम व कव्वाली कार्यक्रम बुधवार दि.8 फेब्रुवारी रोजी रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत, जिरायत कव्वाली कार्यक्रम गुरुवार दि.9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता दर्गामध्ये तसेच रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत, वाजबयान व नाते शरिफ कार्यक्रम शुक्रवार दि.10 फेब्रुवारी रोजी रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत, गझल कार्यक्रम शनिवार दि.11 फेब्रुवारी रोजी रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत, मुशायरा कार्यक्रम रविवार दि.12 फेब्रुवारी रोजी रात्री 10 ते पहाटे 2 वाजेपर्यंत आणि कुस्त्या कार्यक्रम व आतिषबाजी कार्यक्रम सोमवार दि.13 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता आणि रात्री 9.30 वाजता असे कार्यक्रम होणार आहेत.

 मागील वर्षाप्रमाणे या वर्षी ही वरिल सर्व कार्यक्रम महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळा तर्फे साजरा होणार आहेत. दर्गा हजरत खाँजा शमशोद्दीन गाझी रहे. यांच्या वार्षीक उर्स अत्यंत चांगल्या प्रकारे व व्यस्थित पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी जिल्हा पोलीस अधिकक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता, उस्मानाबाद तहसिलदार रा.प.मंडळाचे विभागीय व्यवस्थापक, अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक, नगर परिषदचे मुख्याधिकारी, उस्मानाबाद शहरचे पोलीस निरीक्षक यांनी आपापल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडाव्यात अशा सूचनाही यावेळी केल्या.

 
Top