उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कळंब तालुक्यातील शिराढोण येथे झेंडा लावण्याच्या वादातून दोन गटात तुफान दगडफेक होवुन पोलिसासह अनेकजण जखमी झाले होते. मंगळवारच्या घटनेनंतर बुधवारी जिल्हाधिकारी ओंबासे, पोलिस अधिक्षक यांनी शिराढोण गावास भेट देऊन गावकऱ्यांना शांततेचे आवाहन केले. गुरूवारी दिवसभर कोणतीही अनुसूचीत घटना घडली नसल्याचे सांगण्यात आले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिराढोण येथे झेंडा लावण्यावरून मंगळवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास दोन गटात वाद उफाळून आला. या वादानंतर दोन्ही गटाकडून एकमेंकावर तुफान दगडफेक करण्यात आली. यामध्ये शिराढोण पोलिस ठाण्याचे चार पोलिस कर्मचारी तसेच दोन नागरिक जखमी झाले आहेत. सदरच्या तणावानंतर जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांनी शिराढोण गावास भेट देऊन एकंदर चर्चा केली. व गावकऱ्यांना शांततेचे आवाहन केले. बुधवारी व गुरूवारी शिराढोण मधील व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवूनच शांतता पाळली. प्रशासनाने या ठिकाणी १४४ लागू केले आहे. 

 
Top