उस्मानाबाद /प्रतिनिधी -

          राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सव चे औचित्यसाधत जिल्हा व्यापारी महासंघ, एकता फाउंडेशन व गणेश मंडळ, संस्कृती प्रतिष्ठान, नायगावकर क्लिनिकल लॅब, भागिरथी परिवार, नुतन प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.12 रोजी नूतन प्राथमिक शाळेमध्ये आयोजित शिबिरामध्ये 628 जणांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना त्यांच्या रक्तगट माहिती व्हावा या उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सौ. प्रेमाताई पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. स्मिता गवळी, डॉ. वैशाली डंबळ, डॉ. शिल्पा देशमुख, डाँ. दीपिका सस्ते, डॉ. श्रद्धा मुळे, डॉ. वृंदाराणी विधाते, डॉ. अश्विनी बलवंडे, डॉ. सुकन्या मोटे, शीला उंबरे, शैला दसपुते आदींची उपस्थिती होती.       

           कार्यक्रमाच्या प्रास्ताविकांमध्ये एकता परिवाराचे सचिव अभिलाष लोमटे यांनी कार्यक्रम आयोजन मागची भूमिका स्पष्ट करत दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांच्या उपस्थितीमध्ये असे कार्यक्रम आयोजित करत आहोत असे सांगत आरोग्य शिबिरासंबंधित कार्यक्रमासाठी सर्वांच्या सहकार्य असावे असेही अपेक्षा व्यक्त केली.

          आयोजन संस्थेच्या वतीने राबवण्यात आलेला कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद असून असे नवनवीन कार्यक्रमाच्या पाठीशी सदैव महिला डॉक्टर राहतील असे डॉ. स्मिता गवळी यांनी बोलताना सांगितले. दैनंदिन जीवनामध्ये आपण आरोग्याकडे पण लक्ष देणे गरजेचे असून योग्य प्रमाणात आहार असणे गरजेचे आहे असे डॉ. स्मिता गवळी यांनी व्यक्त केले

         पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबत आरोग्याकडे पण लक्ष द्यावे व त्यांचबरोबर मुलांना मोबाईल व टीव्हीपासून अलिप्त ठेवून जास्तीत जास्त अभ्यासात व खेळाकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा डॉ. वृंदाराणी विधाते यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी पण अभ्यास करत त्याचबरोबर निसर्ग जपण्यासाठी म्हणजे वृक्ष लागवड संगोपन सारख्या उपक्रमांमध्ये हिरहिरीने सहभाग घ्यावा असेही आव्हान यावेळी डॉ. वृंदाराणी विधाते यांनी केले.

           एकता फाउंडेशन, संस्कृती प्रतिष्ठान, जिल्हा व्यापारी महासंघ व नायगावकर क्लिनिकल लँब यांनी जो उपक्रम घेतला आहे त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच असून अशा उपक्रमासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सदैव सोबत राहील अशी ग्याही सौ. प्रेमाताई  पाटील यांनी दिली.आज पण अनेक लोकांना आपले रक्तगट माहिती नसून अशा उपक्रमांमुळे  ते सर्वांना माहिती होण्यास उपयुक्त ठरणार आहेत असेही मत सौ. प्रेमाताई पाटील यांनी व्यक्त केले.

  कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने व वृक्षाला पाणी देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल देशमुख यांनी केले तर कार्यक्रमांमध्ये 160 विद्यार्थी  राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या वेशभूषा मध्ये आले होते.

आभारपर भाषणात मुख्याध्यापक प्रदिपकुमार गोरे यांनी अशा समाज उपयोगी उपक्रमासाठी शाळेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्याही दिली. यावेळी जिल्हा व्यापारी संघाचे सचिव धनंजय जेवळीकर, जगदीश मोदानी, चंद्रकांत गार्ड्रे,  नितीन फड, एकता फाउंडेशनचे कार्याध्यक्ष विशाल थोरात, शिवलिंग गुळवे, नायगावकर क्लिनिकल लँबचे रुपेश नायगावकर, संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम मुंडे व नुतन प्राथमिक विद्यामंदिरचे सर्व शिक्षक उपस्थित होते.

 
Top