तुळजापूर / प्रतिनिधी- 

 तिर्थक्षेञ तुळजापूरात श्री गणेश जन्मोत्सव सोहळा बुधवार दि.२५रोजी पारंपारीक पध्दतीने विविध धार्मिक आयोजन करुन उत्साहात साजरा करण्यात आला.  आज तिर्थक्षेञ तुळजापूर येथील श्रीतुळजाभवानी मंदीरातील उजव्या सोंडेचा श्री  सिध्दविनायक सह शहरातील विविध गणेश मंदीरांनमध्ये गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

येथील  राजा कंपनी तरुण मंडळ श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती मंदिर संस्थान वतीने सकाळी ०६ ते ०८ श्रीचा महाअभिषेक व अंलकार पुजा करण्यात आली.नंतर  सकाळी ०८ वाजता अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम संपन्न झाला. नंतर सकाळी ०९ वाजता श्री च्या पावन पादुकांची नगर प्रदक्षिणा करण्यात येवुन दुपारी १२ वाजता महाआरती व महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला. संध्याकाळी ०९ किर्तनाने या  सोहळ्याचा सांगता झाला.


 
Top