उस्मानाबाद/ प्रतिनिधी -

गेल्या आडीच वर्षांपासून एकच स्क्रीप्ट वाचुन  दाखवतात.अामदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्या लोकप्रतिनिधींना त्याच्या सरकारच्या काळात कृषी मंत्र्यासोबत बैठक घेऊन आपली लायकी सिध्द करा, असे आवाहन  केले होते. परंतू २०२० च्या पीकविम्याबाबत एक  ही बैठक घेण्यात आली नाही त्यामुळे पीक विम्याबाबत समोरा-समोर चर्चा करायची असेल तर त्यांनी त्यांचा वकील पाठवावा, आम्ही आमचा वकील पाठवू उगीच आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करण्यासाठी दररोजचा उंदरा-मांजराचा खेळ आम्हाला नकोय,अशी घणाघाती टिका भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

सोमवार दि. १६ जानेवारी रोजी प्रतिष्ठाण भवन येथे दुपारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस राजसिंह राजेनिंबालकर, अॅड. व्यंकटराव गुंड, दत्ता कुलकर्णी, नेताजी पाटील, अॅड. नितीन भोसले, अॅड. खंडेराव चौरे आदी उपस्थित होते. अिधक माहिती देताना नितीन काळे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सुप्रिम कोर्टापर्यंत पीक विम्यासाठी लढा दिला. पॉलिसी व योजना यामधील फरक साधा विरोधकांना कळत नाही, व्यक्तीगत पातळीवर योजना असते तर पॉलिसीचे उत्तरदायीत्व राज्य व केंद्र सरकारचे सहभाग असल्यामुळे नुकसान भरपाई देण्याचे उत्तरदायीत्व सरकारचे असते असे सांगून आम्ही जनहित याचिका दाखल केली. फक्त रीट दाखल केले नव्हते असे ही नितीन काळे यांनी सांगितले. यावेळी काळे यांनी विनाकारण विरोधक उपोषणामुळे एक लाख ६०हजार शेतकऱ्यांचा फायदा झाला असे सांगत आहेत. हा झालेला फायदा आम्हाला समोरा-समोर दाखवा असा टोला ही काळे यांनी लगावला. यावेळी काळे यांनी मेडीकल कॉलेज, रेल्वे प्रश्न, कृष्णाखोरे पाणी आदी विकासाबाबत समोरा-समोर येऊन चर्चा करावी, असे आवाहन केले. 

स्टंटबाजीसाठी नको

यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी व जिल्हयाच्या विकासासाठी यायचे असेल तर विरोधकांनी समाेरा-समोर यावे केवळ स्टंटबाजीसाठी समाेरा-समोर येण्याचे आवाहन विरोधकांनी देऊ नये, अशी टिका ही कुलकर्णी यांनी केली. 

 
Top