उस्मानाबाद/ प्रतिनिधी -

गौरा फॅशन क्लबच्यावतीने कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘सेलेस्टीयल ब्युटी अ‍ॅन्ड हेरॉईक मॅन ऑफ द ग्रेट भारत 2023’ या स्पर्धेत मिस्टर या श्रेणीत उस्मानाबाद येथील आरेफअली कोतवाल याने विजेतेपद पटकावले आहे.

मॉडेलिंग, ब्युटी या क्षेत्रात सेलेस्टीयल ब्युटी अ‍ॅन्ड हेरॉईक मॅन ऑफ द ग्रेट भारत 2023’ ह उत्कृष्ट स्पर्धा समजली जाते. या स्पर्धेसाठी देशभरातून तीनशे स्पर्धक सहभागी झाले होते. अंतिम फेरीसाठी 36 स्पर्धक पात्र ठरले होते. राज्यातून उस्मानाबाद येथील आरेफअली कोतवाल याने मिस्टर या श्रेणीमध्ये विजेतेपद पटकावले आहे. मॉडेलिंग क्षेत्रातील रजनीश दुग्गल, मिलिंद गुणाजी, डॉ. श्रध्दा जवानजाल, गौरा नाईक आदींनी यांनी स्पर्धेचे परिक्षण केले.

मागील काही वर्षांपासून कोतवाल हा मॉडेलिंग क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण करीत आहे. त्याने यापूर्वीही ग्रामीण भागातून राष्ट्रीय पातळीवर मोलाची कामगिरी केली आहे. यापूर्वी हैद्राबाद येथील स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. सप्टेंबर 2022 मध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाराष्ट्र युथ कार्निवल या स्पर्धेतही त्याने मॉडेलिंग स्पर्धेमध्ये अव्वल येण्याचा मान मिळवला होता. आरेफअली कोतवाल हा राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक रफतअली कोतवाल यांचा मुलगा   असून त्याला या स्पर्धेसाठी वडील कोतवाल यांनी प्रोत्साहन दिले. 


 
Top