उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मोबाईल, टेलीफोन, इंटरनेट  क्षेत्रात अनेक कंपन्या उतरल्या आहेत. आपले ग्राहक तुटू नये म्हणुन ग्राहकांसाठी अनेक उत्तम सुविधा दिल्या आहेत. परंतू केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या बीएसएनएल मात्र सोयी सुविधा देण्यास अपुरी पडली आहे. त्यामुळे खाजगी कंपन्या ग्राहकास चांगल्या सुविधा देत असल्यातरी बीएसएनएलचे रेंज गायब होण्याच्या प्रमाणास महावितरण जबाबदार असल्यामुळेच बीएसएनएलची अधोगती झाली असल्याचे मानले जात आहे. 

बीएसएनएल कार्यालयातील वीज गेल्यास पर्यायी व्यवस्थ  बॅटरी  जरी लावण्यात अाल्या असल्या तरी त्या बॅटरीचे बॅकप अडीच तीन तास असल्यामुळे बॅकप संपल्यानंतर बॅटरी बंद पडते. आणि बीएसएनएल ग्राहकांच्या मोबाईलची रेंज गायब होते. या उलट खाजगी  कंपनीने बॕटरी बॕकप संपल्यानंतर ॲटोमेटीक जनरेटर चालु होण्याचे टेक्निक वापरले आहे  त्यामुळे अनेक ग्राहक खासगी कंपनीच्या मोबाईल, टेलीफोन, इंटरनेट आदी सेवेकडे वळाले आहेत. त्यामुळे बीएसएनएलच्या अधोगतीस ज्या प्रमाणे खासगी कंपन्या आहेत. त्याच प्रमाणे महावितरण  ची सेवा ही जबाबदार आहे. ,

देशात बीएसएनएलचे सर्वत्र कॉर्पोरेट आॅफिसेस होते. बीएसएनएलच्या सर्व जिल्हा कार्यालयात मोठ्या प्रमाणात स्टाफ होता. एकट्या उस्मानाबाद शहरात ५० हजार लॉडलाईन फोन कनेक्शन होते. २८५ टॉवर जिल्हयात उभारण्यात आले आहेत ग्राहकांना सेवा व्यवस्थीत मिळण्यासाठी बीएसएनएलचे ४५ एक्सचेंज केंद्र उभारण्यात आले आहेत जिल्हयाच्या मुख्यालयी ९५ लोकांचा स्टाफ होता. एकेकाळी वैभवशाली खाते असलेले बीएसएनएलआज मात्र विपन्न व्यवस्थेत िदसत आहे. उस्मानाबाद जिल्हा कार्यालयात आज दहा अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. तर सात व्यक्ती प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत आहेत.,

बिल्डींग भाड्याने दिली

उस्मानाबाद शहरात सांजा रोडवर बीएसएनएल कार्यालयाची तीन मजली प्रशस्त अशी इमारत आहे. ४ ते ५ एक्कर परिसरात बीएसएनएल कार्यालयाची बिल्डींग व  स्टाफसाठी क्वार्टर उभारण्यात आले आहेत. परंतू आता हे सर्व एसबीआय बँकेस भाडेतत्वावर देण्यात आले आहे. तर बीएसएनएलचे मुख्यालय तुर्त बाजूच्या एका क्वार्टरमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. कांही महिन्यानंतर हे कार्यालय समता कॉलनी मधील बीएसएनएलच्या जागेत स्थलांतरीत होणार असल्याचे समजते. एकेकाळी बीएसएनएल जिल्हा कार्यालयाचे उत्पन्न महिना तीन कोटी असायचे ते आता ३० लाखाच्या वर आले आहे. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीएसएनएलच्या कोणत्या-कोणत्या जागा विकण्या योग्य आहेत. यांचे प्रस्ताव मागवले असून जिल्हयातील ७० मालमत्तेपैंकी सात मालमत्ता विकण्यायोग्य असल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. 

 बीएसएनएलच्या उभारीसाठी प्रयत्न 

बीएसएनएलला पुर्वीप्रमाणे मोठ्या संख्येने ग्राहक मिळण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयातील ६२९ग्रामपंचायतमधुन बीएसएनएलचे कनेक्शन देण्याचे धोरण आखले आहे. यामध्ये ६० टक्के बीएसएनएल तर ४०टक्के ग्रामपंचायत या प्रमाणे शेअर्स ठरले आहेत.  त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतला बीएसएनएल कार्यालयास २०० स्वेअर मीटर गावठाण मधील जागा मोफत उपलब्ध करून द्यावी, असे आदेश राज्य सरकार ने दिले आहेत. त्याच प्रमाणे भूम-कळंब, लोहारा-उमरगा, उस्मानाबाद या तालुक्यातील २३  गावात बीएसएनएल कंपनीसह अन्य कोणत्याही खासगी कंपनीची आत्तापर्यंत रेंज येत नव्हती अशी गावे कव्हरेज क्षेत्रात आणण्याचे काम सुरू केले आहेत त्याच प्रमाणे बीएसएनएलचे आज ही सरकारी कार्यालय, राष्ट्रीयकृत बँका व इतर ग्राहक जोडून असल्यामुळे व सेवेत सुधारणा केलेल्यामुळे बीएसएनएला पुन्हा उभारी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यासाठी केंद्र सरकारचे सकारात्मक धोरण असणे महत्वाचे ठरणार आहे

 
Top