वाशी / प्रतिनिधी-

तालुक्याला हादरवणाऱ्या एका गावातील गँगरेपमधील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात से प्रस्तुत केले असता एकाला मंगळवारपर्यंत (दि. ३) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले तर चौघे अल्पवयिन असल्याने त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली.

वाशीतालुक्यातील एका गावात जनावरांना पाणी पाजवण्यासाठी नदीवर गेलेल्या एका २० वर्षीय युवतीवर एकाने उसाच्या शेतात नेहून मारहाण करत अत्याचार केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अत्याचार करणाऱ्याने अन्य चार साथीदारांना बोलावून युवतीवर पुन्हा पाच जणांनी अत्याचार केला. याप्रकरणी वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. नंतर याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. यामध्ये पाचही आरोपींना लागलीच अटक करण्यात आली. शनिवारी त्यांना न्यायालयासमोर प्रस्तुत करण्यात आले. यामध्ये पाच जणांपैकी चारजण अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्यांना तातडीने बालसुधारगृहात पाठवण्यात आले. तसेच एकाला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिस याप्रकरणी कसून तपासणी करत आहेत.

 
Top