तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथिल जिल्हा परिषद कन्या प्रशाळेतील दहाविच्या वर्गमैत्रीणी तब्बल 25 वर्षानंतर पुन्हा भेटल्या. यावेळी सर्व जिवलग वर्ग मैत्रिणींनी त्यांच्या शिक्षकांसह जुन्या आठवणींना उजाळा दिला.

 शहरातील जि.प. कन्या प्रशाला सन 1996-97 च्या दहावीच्या वर्ग मैत्रिणींचा स्नेहमेळावा संपन्न झाला या स्नेह मेळाव्यासाठी शहरातील स्थानिक अमृता मलबा, शैलजा गवळी, गौरी देशमुख, अरुंधती कुलकर्णी वर्गमैत्रिणींनी पुढाकार घेत  या मेळवासाठी 25 वर्गमैत्रिंणीनी हजेरी लावली. या मेळाव्यास त्यावेळच्या शिक्षकांनाही निमंत्रित करण्यात आले होते.

 श्री चौधरी श्री आंबेकर  श्रीमती राऊत बाई श्रीमती पारधे बाई, श्रीमती, आचलेरकर बाई, श्रीमती जळके मॅडम उपस्थित होत्या. यावेळी सर्व मैत्रणीनी संगित मैफिलीचा आनंद घेतला. सुत्रसंचालन शैलजा गवळी, स्वाती देशमुख व शुभांगी कदम यांनी केले. तर  कार्यक्रमाचे आभार अमृता मलबा नी केले.


 
Top