उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील जुणोनी, वलगुड, झरेगाव ग्रुपग्रामपंचायत उपसरपंच पदी इर्शाद सिकंदर शेख यांची निवड करण्यात अली. सरपंच सौ लता अमोल मुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मीटिंग मध्ये ही निवड झाली. थेट जनतेतून सरपंच पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सौ लता अमोल मुळे या निवडून आल्या आहेत तर सात सदस्य महाविकास अघाडीचे निवडून आले होते गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

यावेळी इर्शाद शेख व नितीन भोंग यांचे अर्ज आल्याने निवडणूक झाली यावेळी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले यामध्ये इर्शाद शेख यांनी सहा विरुद्ध तीन मतांनी नितीन भोंग यांचा पराभव केला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गंगाधर कुलकर्णी, धनाजी गोरोबा सोनवणे, रुकसाना नबी शेख, शैला आबा खैरे, स्वाती विनोद मुळे, पल्लवी महेश बचुटे यांनी मतदानाचा हक्क बजावला तर मथुराबाई प्रकाश भोंग या एकमेव सदस्या गैरहजर राहिल्या यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन  निसार पटेल,माजी सरपंच अमोल मुळे, पोलीस पाटील रवी बोते, रंगनाथ कुलकर्णी, राजेंद्र मुळे, खालेद शेख,वकील शेख,मा सरपंच विठ्ठल खैरे, सिकंदर शेख,शहाजी मुळे, ऐजीनाथ सरवदे, अली शेख ,निलेश सोनवणे,बालाजी सोनवणे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून नागटिळक ए आर, तलाठी पडवळ ए ए ,ग्रामसेविका एस. एच.मोरे, पोलीस कर्मचारी सुधीर तुगावकर व गणेश पाटील ग्रामपंचायत कर्मचारी हणमंत सरवदे, दत्तात्रय सरवदे यांची उपस्थिती होती.


 
Top