उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारत निवडणूक आयोगाने दि.29 डिसेंबर 2022 च्या पत्रकान्वये महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक चा कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान सोमवार, दि.30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 4.00 पर्यंत आणि मतमोजणी गुरुवार, दि.02 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.

 ा निवडणूकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्‍यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा दि.23 जून 2011 च्या शासन निर्णयानुसार देण्यात येणार आहे. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ तथा उप आयुक्त (सामान्य प्रशासन) विभागीय आयुक्त यांनी कळविले आहे.


 
Top