तुळजापुर / प्रतिनिधी-

श्री तुळजाभवानी मातेच्या  शाकंभरी नवराञोत्सवाची सांगता  शुक्रवार  दि६ रोजी   छबिना काढल्यानंतर   देविचे मुख्य  महंत वाकोजीबुवा यांनी देवी मंदीरात अंबाबाईचा  जोगावा मागितल्या नंतर  सांगता झाली. 

 शुक्रवार राञी  हजारो  भाविकांच्या उपस्थितीत आई राजा उदो सदानंदीचा उदो उदो व संभळाचा कडकडाटात वाघ  वाहनावर  छबिना काढण्यात आला . नंतर देविचे महंत  वाकोजीबुवा यांनी मंदिर प्रांगणात अंबाबाईचा जोगवा या नावाने आपल्या उपरण्याची झोळी करुन जोगवा मागितला.  यावेळी उपस्थितीत विश्वस्त, मंदीर अधिकारी, कर्मचारी मानकरी सेवेकरी उपस्थितीत होते.  त्यांनंतर महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा यांनी  भाविकांना खोबरे वाटप केले. त्यानंतरच मंदीर बंद केले जाते. 


 
Top