तुळजापुर / प्रतिनिधी-

 शहरातील नगरपालिका शाळा क्रं. 2 च्या विकास कामासाठी 2 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल कुतवळ यांनी नगरविकास खात्याचे उपसचिव  अनिरुध्द जेवळीकर यांच्याकडे निवेदन सादर करुन केली आहे.या शाळेस निधी देण्या बाबतीत आपण जातीने प्रयत्न करण्याचेआश्वासन उपसचीव जेवळीकर यांनी िदले. 

 नगरविकास खात्याचे उपसचिव अनिरुध्द जेवळीकर हे येथील भूमीपुञ असल्याने त्यांनी नगरविकास खात्याकडुन निधी उपलब्ध करुन देण्या बाबतीत मुखमंञी एकनाथ यांच्या कडे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मुख्याधिकारी अरविंद नातु,  नगरअभियंता  अशोक सनगले, मुख्याध्यापक गणेश रोचकरी,  महेंद्र कावरे उपस्थितीत होते.


 
Top