तुळजापूर / प्रतिनिधी-
श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञोत्सवाचा सांगता शुक्रवार दि.६रोजी होमकुंडात कोहळ्याची पुर्णाहुती दिल्या नंतर घटोत्यापन करण्यात येवुन झाली.
शाकंभरी पोर्णिमा दिनी पहाटे चार वाजता चरणतिर्थ होवुन धर्मदर्शनास आरंभ झाला. नंतर सकाळी सहा वाजता देविजीस सिंहासन महाअभिषक पुजा करण्यात आल्यानंतर भाविकांचे अभिषेक करण्यात आले ते संपल्यानंतर देविजीस वस्ञोलंकार घालण्यात आले. नंतर श्रीगणेश ओवरीत दुपारी होमकुंडात कोहळ्याची पुर्णाहुती शांकंभरी यजमान श्री व सौ कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आल्यानंतर घटोत्यापन करण्यात आले .
शाकंभरी पोर्णिमा निमीत्ताने राञी मंदीर प्रांगणात छबिना काढण्यात आल्यानंतर महंतवाकोजी बुवा यांनी प्रक्षाळपुजा केल्यानंतर महंत तुकोजीबुवा यांनी शांकंभरी नवराञोत्सवातील पोर्णिमेचा जोगवा मागितल्या नंतर शाकंभरी नवराञोत्सवातील धार्मिक विधीचा सांगता झाला.