तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील कसई,  येथील अविदा नवनाथ कांबळे या महिलेच्या खुन प्रकरणी काही संशियीतांची   चौकशी केल्याचे वृत्त  आहे.  तुळजापूर तालुक्यातील कसई येथील अविदा नवनाथ कांबळे वय ४० वर्षे या  गायब झाल्या होत्या  अखेर गुरुवार  दि.०५. रोजी दुपारी २.०० वा. दरम्यान कसई शिवारात अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अविदाच्या शरीरावर कशानी तरी वार करून जखमा केल्या  व गळा आवळून खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अविदा यांचा मृतदेह शेजारील ज्वारीच्या पिकात टाकून पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न केला. अशी  फिर्याद  बहिण- सिध्दुं रामराव भोवळ रा. कसई, ता. तुळजापुर यांनी दिल्यावरुन   भा.दं.सं. कलम ३०२,२०१ अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.


 
Top