तुळजापूर / प्रतिनिधी-

  तिर्थक्षेञ तुळजापूर येथुन परत गेलेले उपविभागीय महिती कार्यालय परत तुळजापूरला कार्यान्वित करु ,असे आश्वासन आ .राणाजगजितसिंह  पाटील यांनी दर्पन दिनी  आयोजित कार्यक्रमात दिले. प्रारंभी नरेश अमृतराव यांच्या वतीने काढण्यात आलेल्या दिन दर्शिकेचे प्रकाशन पञकारांचा हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात तिर्थक्षेञ तुळजापूर विकास आराखडा बाबतीत चर्चा करण्यात आली. भाविकांच्या वाढत्या संखेच्या पार्श्वभूमीवर तिर्थक्षेञ तुळजापूर मंदीर परिसराचा विकास होणे काळाची गरज आहे .आजपर्यत झालेले  विकास कामे नियोजन  भविष्याचा विचार  न करता न केल्याने आज मंदीर परिसराचा विकास करणे गरजेचे बनले आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर मंदीर  परिसरात असणाऱ्या पुजा-यांची  घरे हे त्यांच्या अर्थिक उत्पन्नाची स्ञोञ असल्याने कमीकमी पुजारीवृंद विस्थापीत होतील असे विकास कामे व्हावेत असा सुरु यावेळी निघाला .

यावेळी जनसेवक नरेश अमृतराव पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जन सांळुके नगरसेवक औदुंबर कदम पंडीत जगदाळे शांताराम पेंदे नागेश नाईक आनंद कदले सुहास सांळुके शिवाजी बोदले गिरीश देवळालकर अर्जून अमृतराव सह जनसेवक भाजपा पदाधिकारी कार्यकते उपस्थितीत होते.


 
Top