तुळजापुर / प्रतिनिधी-

अध्यात्म गुरु श्रीश्रीश्री गुरुदेव रविशंकर हे २ फेब्रुवारी २०२३रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरात येणार आहेत. २ फेब्रुवारी रोजी सांयकाळी पाच वाजता नळदुर्ग रोडवरील सैनिक  स्कुल मैदानवर जागर भक्तीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

तुळजापूरात आज पर्यत पाच हजार जणांनी आर्ट आँफ लिव्हींग कोर्स केला  आहे. अध्यात्म गुरुदेव श्रीश्रीश्री रविशंकर तिर्थक्षेञ तुळजापूर येथे नांदेडहुन २ फेब्रुवारी २०२३ रोजी तिर्थक्षेञी दुपारी येणार असुन चार वाजता तिर्थक्षेञी आगमन होणार आहे.  या सत्संगासाठी धाराशिव- सोलापूर -लातुर तीन जिल्हयातील एक लाखभर साधक येण्याची शक्यता आहे.


 
Top