उमरगा/ प्रतिनिधी-

 सामाजिक गतीमानते मुळे एका बाजूला माणसा- माणसांच्या मनामनातील अंतर वाढू लागले असताना ..... संपुर्ण आयुष्य प्रत्येकांशी माणुसकीच्या नात्याची जपणूक करून माणुसकी व आपुलकी निर्माण करणारी "देव माणसं " समाजात पहायला मिळतात. उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयातील औषध निर्माण अधिकारी सुधीर कुरूम हे ३१ डिंसेबर रोजी सेवा निवृत्त झाले. रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यानी स्ववर्गणीतून त्यांचा येथील शांताई मंगल कार्यालयात सपत्नीक निरोप समारंभाचा सत्कार सोहळा आयोजित करून समाजाला सेवानिवृत्तीच्या समारंभात स्नेहाच्या सुगंधाचे दर्शन घडवून आणले. माणसा माणसांच्या मनामनातील अंतर वाढून माणसं स्वतःच्या स्वार्था करिता एकमेकां पासून दूर जातानाचे चित्र एका बाजूला दिसून येत असले तरी या सेवा निवृत्तीच्या समारंभात मात्र माणुसकीच्या स्नेहाचा सुगंध दरवळत असल्याचे दिसून आले.

 तुगांव - अचलेर येथील सुधीर कुरुम यांनी बीड, उस्मानाबाद , नांदेड या विविध जिल्ह्यात २७ वर्ष अरोग्य सेवा केली.

कोविड कालावधी दरम्यान उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल त्यांना अरोग्य विभागाच्या वतीने सन्मानीत करण्यात आले. शनीवार दि. ३१ डिंसेबर रोजी त्यांच्या सेवा निवृत्ती बद्दल त्यांना अरोग्य कर्मचारी, मित्र परिवार तुगांव - अचलेर ग्रामस्थ यांच्या वतीने सेवा निवृत्ती बद्दल निरोप देण्यात आला .

 सेवा निवृत्ती निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी वैद्यकिय अधिक्षक डॉ. श्रीनिवास जाधव होते.डॉ. लक्ष्मण सातपुते, डॉ.जगनाथ कुलकर्णी, डॉ. संतोष कांबळे, डॉ.विक्रम आळंगेकर, डॉ. प्रवीण जगताप, विष्णू मुळे , दिलीप भोसले डॉ. बिचकाटे, आश्विनी पाटील, अज्ञान जाधव , सुनिता घोडके,यास्मीन मुल्ला , संगीता कुरले, बालिका गायकवाड, सुनिता मारकड , शोभा तुरोरे सह आदि अरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

 प्रास्तावीक कार्यालयीन अधिक्षक दत्तात्रय शिदे यांनी केले. सुत्रसंचालन पद्माकर घोगे यांनी केले.या वेळी माजी वैद्यकिय अधिक्षक डॉ. श्रीनिवास जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सरपंच पती सुभाष सोलंकर, चेअरमन धनराज माने ,तुगांव व अचलेर येथील नूतन ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती. राजेंद्र काळे, वैजीनाथ पवार यांनी मनोगत व्यक्त केले. माझ्या सेवा निवृत्ती ला माणुसकीचा उजाळा मिळाल्याच्या भावना सुधिर कुरुम यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या. मित्रमंडळ, नातेवाईक , सामाजिक संघटना यांच्या वतीने सुधीर कुरूम व मीरा कुरूम यांना सन्मानीत करण्यात आला. माणुसकीच्या नात्यांचा सुगंध लाभलेल्या या सेवा निवृत्ती समारंभ यशस्वी करण्यासाठी संदीप वाघमारे, आनंद सुंटनूरे, शैलेश लोखंडे, नागराज तेलंग, अभय भालेराव , सह आदिनी विशेष परिश्रम घेतले. समीर कुरुम व सुजाता कुरूम यांनी आभार मानले .


 
Top