आचारसंहिता भंग तक्रार निकाली 
 तुळजापूर / प्रतिनिधी-
 श्री तुळजाभवानी मंदीरात भाजपा नेत्या चिञा वाघ यांनी  पञकार परिषद घेऊन  शिक्षक मतदार संघाची आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महाविकासआघाडी ने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती ही तक्रार चौकशी अंती निकाली काढण्यात आली. यावेळी चित्रा वाघ यांचे मतदारावर प्रभाव पडेल, असे कोणते ही भाष्य झाले नाही, असा अहवाल देण्यात आला आहे. 
 १७ जानेवारी रोजी  उपरोक्त विषयी संदर्भिय तक्रारीच्या अनुषंगाने संदर्भिय क्र.(२) अन्वये सादर केलेल्या अहवालानुसार
सदर घटनेतील चर्चेच्या दरम्यान शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने कोणतीही चर्चा झाली नसल्याचे तसेच औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीतील मतदारांवर प्रभाव पडेल असे भाष्य झाले नसल्याचे प्रथम दर्शनी दिसून आल्यामूळे सदर बाबतीत आचारसंहिता भंग झालेली नसल्याचे जिल्हाधिकारी तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
 
Top