उस्मानाबाद /प्रतिनिधी - महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षीक निवडणूक 2023, 0५- औरंगाबाद विभाग शिक्षक  मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या कार्यक्रमानुसार दि. 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 0८.00 वा. ते सायंकाळी ४.00 वा. पर्यंत उस्मानाबाद जिल्हयातील एकूण 25 मतदान केंद्रावर मतदान होणर आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. पोलीस बंदोबस्त आणि कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारी व प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

                   जिल्हयाच्या संपूर्ण मतदान प्रक्रियेवर जिल्हाधिकारी कार्यालयातील Control Room मधून सनियंत्रण, सर्व मतदान केंद्राच्या web casting ची निरिक्षण व नियंत्रण, निवडणुक प्रक्रिये दरम्यान वापरणात येणा-या सर्व वाहनांचे GPS Tracing, निवडणुक विषयक सर्व अहवाल संकलन यंत्रणा कार्यन्वीत असेल.

                    तालुका निहाय मतदान केंद्र संख्‍या व मतदार संख्‍या पुढीलप्रमाणे आहे. भूम तालुक्यात एकूण 3 मतदान केंद्र असून एकूण शिक्षक मतदार संख्या 344 आहे. परंडा तालुक्यात एकूण 3 मतदान केंद्र असून एकूण शिक्षक मतदार संख्या 389 आहे. वाशी तालुक्यात एकूण 2 मतदान केंद्र असून एकूण शिक्षक मतदार संख्या 288 आहे. कळंब तालुक्यात एकूण 3 मतदान केंद्र असून एकूण शिक्षक मतदार संख्‍या 732 आहे. उस्मानाबाद तालुक्यात एकूण 4 मतदान केंद्र असून एकूण शिक्षक मतदार संख्‍या 1 हजार 515 आहेत. तुळजापूर तालुक्यात एकूण 5 मतदान केंद्र असून एकूण शिक्षक मतदार संख्‍या 656 आहे. लोहारा तालुक्यात एकूण 2 मतदान केंद्र असून एकूण शिक्षक मतदार संख्‍या 360 आहे आणि उमरगा तालुक्यात एकूण मतदान केंद्र 3 असून एकूण शिक्षक मतदार संख्‍या 929 आहे. असे एकूण 8 तालुक्यात मिळून 25 मतदान केंद्र असून 5 हजार 213 मतदार संख्या आहे.

                     प्रत्येक मतदान केंद्रासाठी 3 पोलीस कर्मचारी किेंवा होमगार्डस तसेच 29 जानेवारी 2023  आणि 30 जानेवारी 2023 या रोजी विशेष पोलीस सेक्टर पेट्रोलींग अशी बंदोबस्त व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रापासून 100 मि. आणि  200 मि. वर चूना फक्‍की मार्कींग आणि या हददीमध्ये प्रचार करण्यास निर्बंध असणार आहेत. मतदान केंद्रावर मोबाईल किंवा कॅमेरा इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूना मनाई. ( मतदान गोपनीयतेचा भंग न होणाच्‍या दृष्टिने)  मतदान दिवशी दि. 30 जानेवारी रोजी संपूर्ण जिल्हयात मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंध ठेवण्याचे आदेश निर्गमित. 25 मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफरची नेमणूक, Live Webcasing आणि जिल्हास्तरीय कंट्रोल रुम मधून 25 मतदान केंद्रावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.

                   मतदान पथकाची मतपेटयासह वाहतूक करणा-या 25 वाहनांना GPS Tracking, 8 क्षेत्रिय अधिकारी यांचे वाहनांन GPS Tracking, जिल्हास्तरावरील Control Room मधून सर्व वाहनांचे Tracking केले जाईल. जंम्‍बो मतपेट्या संख्‍या  प्रत्‍येक मतदान  केंद्रास 2 व राखीव सह - 83 ठेवण्यात येणार आहेत. 25 मतदान केंद्रासाठी मतदार यादीतील नावाची पडताळणी करण्यात मतदान हेल्पडेस्क मदत करतील.

                 क्षेत्रिय अधिकारी- 8, मतदान केंद्राध्‍यक्ष व मतदान अधिकारी-132, शिपाई- 33, सुक्ष्‍म निरीक्षक- 33 आणि  पोलीस कर्मचारी- 100 अशा प्रकारे मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

                   भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान ओळखपत्रा व्यतीरिक्त इतर ग्राहय ओळखीचे पुरावे 

पुढील प्रमाणे. आधार कार्ड (Adhar Card ), वाहन चालक परवाना (Driving License), पॅन कार्ड (Pan Card ), भारतीय  (Passport), केंद्र किंवा राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र (Service Identity Card issued by the educat6ional institutions in which the lectors of the concerned Teachers/ Diploma issued by University, may by employed), खासदार तसेच आमदार यांचे अधिक्रत ओळखपत्र (Official identity cards issued to MPs/MLs IMLCs), संबधित पदवीधर शिक्षण मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर, शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र (Service identity Card issued by the educational institutions in which the lectors of the concerned Teachers/ Diploma issued by University, may employed), विश्वविद्यालयाद्वारे वितरीत पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र (Certificate of degree/Diploma issued by University, in orginal), सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत पुरविलेले जांभळया अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र( Certificate of physical handic ap issued by competent Authority in original) आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र (ODID)

                 भारत निवडणूक आयोगाने पुरविलेले जांभळ्या शाईच्या स्केच पेननेच पसंतीक्रम नोदवून मतदान करणे आवश्य्क. इतर पेनचा वापर केल्यास असे मत अवैद्य ठरु शकते.

                 मतदान दिवस दि. 30 जानेवारी 2023 रोजी शिक्षक मतदानासाठी एक दिवसाची नैमत्तिक रजा देण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

                            ******

 
Top