तेर/  प्रतिनिधी  

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे , प्रादेशिक विद्या प्राधिकरण (आंग्लभाषा तज्ञत्व ) व दलित मित्र कदम गुरुजी कॉलेज, मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय राज्यस्तरीय इंग्रजी भाषा परिसंवाद 2023 चे आयोजन दलित मित्र कदम गुरुजी कॉलेज, मंगळवेढा जि. सोलापूर येथे  आयोजित करण्यात आले होते. 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हे या राज्यस्तरीय परिसंवादामध्ये सहभागी झालेले होते. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त  सुरज मांढरे  , सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी  दिलीप स्वामी   , प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबादचे संचालक डॉ. कलीमुद्दीन शेख   व दलित मित्र कदम गुरुजी कॉलेजचे अध्यक्ष   सुभाष कदम  यांच्या उपस्थितीत या राज्यस्तरीय परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनी राज्यातील सर्व इंग्रजी शिक्षकांना सखोल असे मार्गदर्शन केले. 

या परिसंवादमध्ये एकूण चार विषयावर राज्यातील इंग्रजी शिक्षकांना आपले सादरीकरण करावयाचे होते. पहिला प्रकार म्हणजे पेपर प्रेझेंटेशन अणि दुसरा प्रकार म्हणजे पोस्टर प्रेझेंटेशन. पेपर प्रेझेंटेशन मध्ये महाराष्ट्रातील जवळपास 110 इंग्रजी शिक्षकांनी त्याचे पेपर सादर केले तर पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये 30 शिक्षकांनी सादरीकरण केले.  

  उस्मानाबाद जिल्ह्यातील  संजय तुकाराम पवार ,  सर्जेराव गरड,  मनोज बदिमे व  सरिता उपासे या  चार शिक्षकांनी  राज्यस्तरीय इंग्रजी परिसंवादामध्ये सहभाग नोंदवला होता.त्यामध्ये पेपर प्रेझेंटेशन या प्रकारात   संजय तुकाराम पवार(रा.तेर )यांनी महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावलातर पोस्टर प्रेझेंटेशन या प्रकारात  सरिता उपासे व  मनोज बड़ीमें  यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद येथील इंग्रजी विभाग प्रमुख  सुचित्रा जाधव यांनी या सादरीकरणासाठी सर्वांना मार्गदर्शन केले होते.

त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबादचे प्राचार्य डॉ दयानंद जटनुरे , उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी  सुधा साळुंखे व   माध्यमिक शिक्षण अधिकारी  गजानन सुसर   व इंग्रजी विभागप्रमुख  सुचित्रा जाधव जिल्हा शिक्षण व शिक्षण विभाग उस्मानाबाद यांनी अभिनंदन केलेले आहे .


 
Top