तेर/  प्रतिनिधी  

 विविध विभागाच्या माध्यमातून महिलांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्यात यावे असे  आवाहन  कॅपॅसिटी बिल्डींग कमिशन (भारत सरकार)  सदस्य प्रवीण परदेशी यांनी केले.                   

उस्मानाबाद तालुक्यातील तेर प्रभागाअंतर्गत आळणी व खेड गावांमध्ये उमेद व TRIF संस्था यांच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यासंदर्भात आयोजित महिला मेळावा प्रसंगी परदेशी बोलत होते. वेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी.राहुल गुप्ता , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे , उस्मानाबाद तालुक्याचे तहसीलदार  गणेश माळी , पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी .एस.एस.नलावडे ,खेडचे सरपंच .सुनील गरड,आळणीचे उपसरपंच कृष्णा गाडे,जिल्हा अभियान व्यवस्थापक  डॉ. बलवीर मुंडे , तालुका अभियान व्यवस्थापक  पूजा घोगरे , तालुका व्यवस्थापक .अभिजीत पडवळ, नागेश काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. . खेडमध्ये दूध डेरीचे उद्घाटन प्रविण परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.  याचबरोबर खेडमधील महिलांच्या विविध व्यवसायांना भेटी देऊन पाहणी केली. TRIF संस्था समन्वयक .जावेद  सय्यद यांनी TRIF संस्थेबद्दल सविस्तर अशी माहिती दिली. प्रभाग समन्वयक राम अंकुलगे यांनी आळणी व खेड गावातील उमेद गटातील महिलांची केलेल्या कार्याची सविस्तर  माहिती  सादर केली. यावेळी प्रभाग समन्वयक अमोल खवले, श्रीराम भोसले,अमर सूर्यवंशी, संतोष गवळी उपस्थित होते.  प्रमुख पाहुण्यांनी आळणी तसेच खेड मधील गटातील  महिलांना चालू असलेले व्यवसाय आणि पुढे करावयाचे व्यवसाय याबद्दल सखोल अशी चर्चा करून मार्गदर्शन केले.


 
Top