उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नगरपरिषद नेउस्मानाबाद शहरातील देशपांडे गणेश नगर या परिसरातील मागील बाजूस शहरातून जमा झालेल्या कचऱ्याची साठवणूक केलेली आहे .या ठिकाणी 25 ते 30 फूट उंच कचऱ्याचा ढीग जमा झालेला आहे सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे काही लोक या कचऱ्याला पेटवून शेकोटीचा आनंद घेत आहेतपरंतु कचऱ्यामधील आग  विझल्यानंतर हा कचरा धुमसल्यामुळे शहरात रात्री आठ साडेआठ नंतर सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. या धुरामुळे अनेक नागरिकांना घसा दुखी खोकला आदी ‘श्वसनाचे आजार होत आहेत.  त्यामुळे याविषयी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. 

उस्मानाबाद शहरात दररोज हजारो टन कचरा गोळा होतो या कचऱ्याची साठवणूक देशपांडे स्टँड ते गणेश नगर या भागाच्या मागील बाजूस होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या भागातील लोक पावसाळ्यात तर दुर्गंधीचा सामना करतात सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे काही लोक या कचऱ्याला पेटवत आहेत. त्यामुळे शहरातील गणेश नगर, खाजा नगर,  देशपांडे स्टॅड, शम्स चौक, नेहरू चौक,  मारवाड गल्ली,  निंबाळकर गल्ली,  गवळी गल्ली आदी परिसरात धुराचे साम्राज्य पसरत आहे. या धुरामुळे प्रदूषणात अनेक रासायनिक घटक मिसळले असल्यामुळे अनेक नागरिकांना घशात खवखव होणे, घसादुखी खोकल्याचा त्रास आदी  श्वासनाचे आजार होत आहेत.याप्रकरणी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे शहरात अनेक ठिकाणी स्वच्छता कामगार गोलू गल्ली जमा केलेला कचरा पेटवून देत आहे .  सदरची घटना ही सकाळची असते त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचे ब्रीद असलेले हवा पाणी और तुळजाभवानी याला छेद देणारी ही कृती होत आहे .प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे.


प्रशासनाचे दुर्लक्ष 

उस्मानाबाद शहर हे नौकदारांचे शहर म्हणुन संबोधले जाते. उस्मानाबाद शहरात अनेक ठिकाणी अनेक सरकारी नौकरदार राहतात. त्यांना सुध्दा या दुराचा त्रास होत आहे. परंतू वेळे अभावी त्याकडे दुर्लक्ष करून घशाच्या दुखण्यामुळे व घोकल्यामुळे डॉक्टरकडे जाऊन औषध गोळ्या घेत आहेत. मानव निर्मीत धुराच्या प्रदुषणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

                         अॅड.अविनाश मैंदरकर-नेहरू चौक उस्मानाबाद 



 
Top