कळंब / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पानगाव या गावाजवळील गायरान जमीनीवरील अतिक्रमण वरुण दोन समाजात गोंधळ झाला आहे. या मध्ये येरमाळा पोलिस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यावेळी एका गटाने अतिक्रमीत जमिनीवर उभारलेल्या झोपड्यांना आग लावली त्यामुळे तणावाचे वातावरण १६ जानेवारीच्या रात्री निर्माण झाले होते. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील अनेक गावात मागील काही वर्षांपासून एक समाज गायराण वरती अतिक्रमण करुण गायरान जमीन कसत आहे. कळंब तालुक्यातील पानगाव 

परिसरात गावातील गायरान वरती अतिक्रमण करुण जमीन कसतात व त्याच ठिकाणी झोपड्या करुण राहतात. गावातील अनेक शेतकऱ्यांच्या गायरान च्या आसपास जमीन आहे. त्यामुळे अतिक्रमण धारक व शेतकऱ्यामध्ये वारंवार वाद होत आहे. अनेक शेतकऱ्यांना या गायरान मधुन येजा करावी लागते, शेतातील माल वाहनाव्दारे  घेऊन जावा लागतो, वाहन अथवा पायी जाताना 

अतिक्रमण धारक आवडतात असे गावकरी सांगत आहेत. त्यावरून मागील काही दिवसांपासून हा वाद सुरू आहे. 

 

======

दिनांक १६ जानेवारी रोजी पानगाव येथे अतिक्रमणधारक व गावकरी यामध्ये वाद झाला. आणि या वाद सुरू झाला होता. याचे रुपांतर भांडणात झाले, या मध्ये अतिक्रमणधारकांच्या झोपड्या पेटवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामध्ये दोन गटातील काहीजण जखमी झाले आहेत.


 
Top