उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 धाराशिव येथील मराठा सेवा संघ कार्यालय येथे संभाजी ब्रिगेड ची आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती याच बरोबर संभाजी ब्रिगेड च्या रिक्त पद नियुक्ती देखील करण्यात आली ह्या वेळी शिवश्री.शुभम पाडे पाटील यांची संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पदी व शुभम चव्हाण यांची संभाजी ब्रिगेड शहर सचिव पदी निवड करण्यात आली.

 यावेळी प्रा.शशिकांत कण्हेरे सर ( प्रदेश उपाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड तथा धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख,शिवश्री अतुल गायकवाड (प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र), ॲड.तानाजी सुभाषराव चौधरी (संभाजी ब्रिगेड , जिल्हाध्यक्ष,उस्मानाबाद) , शिवश्री.शरद पवार (संभाजी ब्रिगेड , जिल्हाध्यक्ष, तुळजापूर विभाग) , शिवश्री आकाश मुंडे (संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष) , आदित्य देशमुख ( शहराध्यक्ष , धाराशिव) , धनराज बिराजदार (संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक धाराशिव), बालाजी यादव (संभाजी ब्रिगेड लोहारा तालुका अध्यक्ष), महादेव मगर (संभाजी ब्रिगेड विधानसभा अध्यक्ष तुळजापूर ), समाधान सरडे (संभाजी ब्रिगेड सोशल मीडिया प्रमुख तुळजापुर) व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top