उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद पोलीस आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या माध्यमातून महिला व बाल सुरक्षा अभियान  पोलीस अधीक्षक,  अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्ह्यात महिनाभर राबवीले जात आहे.

 यामध्ये महिला व बालक सुरक्षा संदर्भात शहर तसेच ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालयात मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाच्या माध्यमातून हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. नमूद विद्यापीठाच्या विद्यार्थीनी- श्रध्दा पोखरकर, धम्मपाली चव्हाण, शुभांगी गायकवाड, ध्वनी पुरोहित या अभियानात विशेष प्रयत्न करीत आहेत.

 

 
Top