उस्मानाबाद / प्रतिनिधी-

औरंगाबाद शिक्षक मतदार संघासाठी उस्मानाबाद जिल्हयात  प्राथमिक माहिती नुसार  80
ते ९०   टक्के मतदान झाले असून जिल्हयात महाविकास आघाडीचे विक्रम काळे व भाजपचे किरण पाटील यांच्यात चुरशीची लढत असल्याचे पहायला मिळाले आहे. 


उस्मानाबाद जिल्हयात एकुण ५ हजार २१३ मतदार आहेत. त्यापैकी 80 ते ९०   टक्के मतदान झाले आहे. जिल्हयात एकुण  २५ मतदान केंद्र होते. सकाळी ८ ते १० पर्यंत मतदानाचा वेग कमी असल्याने ११ टक्के मतदान झाले होते. तर १२ पर्यंत ३७ टक्के मतदान झाले होते. दुपारी दोन पर्यंत मात्र मतदानाचा वेग वाढुन ६० टक्के मतदान झाले होते.मतदान संपल्यानंतर माहिती मिळण्यात रात्री उशीर झाला.   जिल्हयात उमरगा, नळदुर्ग, तुळजापूर, भ्ूम, कळंब, उस्मानाबाद तालुक्यातील कांही भागात विक्रम काळे यांना प्रतिसाद दिसला  तर उस्मानाबाद शहर व इतरत्र परंडा, वाशी, भूमच्या कांही भागात किरण पाटील यांना चांगला प्रतिसाद दिसला.  मराठवाडा शिक्षक संघाचे विश्वासराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर प्रदीप साेळुंखे यांचे नावेही चर्चेत होती.

 

 
Top