उस्मानाबाद / प्रतिनिधी-

न्यायालयातील प्रलंबीत खटले लोकअदालत मध्ये समोपचाराने मिटविण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षा  अंजू एस.शेंडे यांनी केले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली आणि राजय विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या सुचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे राष्ट्रीय  लोकअदालत आयोजित केली आहे.   न्यायालयीन प्रलंबित ,तसेच वादपूर्व प्रकरणांमध्ये झटपट न्यायनिर्णय व्हावेत,या उद्देशाने येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने दि.11 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा न्यायालय,उस्मानाबाद येथे व सर्व तालुका न्यायालयात  राष्ट्रीय लेाकअदालतीचे आयोजन केले आहे.

 या  लोक अदालतीमध्ये दिवाणी प्रकरणे,तडजोडपात्र फौजदारी खटले,मोटार अपघात प्रकरणे,कौटुंबिक वाद प्रकरणे,धनादेशाचे प्रकरणे जिल्हा तक्रार निवारण आयोग उस्मानाबाद येथील तडजोडीस पात्र प्रलंबित प्रकरणे तसेच मोटारवाहन भंगाची वाहतूक शाखेची दाखल पुर्व प्रकरणे समेटासाठी पक्षकारांनी पुढे  यावे व लोक अदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षा  अंजू एस.शेंडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे वरिष्ठ न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वसंत यादव यांनी केले आहे.


 
Top