उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील प्रसेना प्रतिष्ठानच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल  66 रक्तदात्यांनी रक्तदान करून अभिवादन केले. 

शहरातील प्रसेना प्रतिष्ठानच्या वतीने मागील 14 वर्षांपासून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी सोमवार  6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

शिबिराचे  उद्घाटन सकाळी आमदार कैलास दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे,माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी नगरसेवक सोमनाथ गुरव, रवि वाघमारे ,पिंटू कोकाटे, उपस्थित होते.  या शिबिरास आमदार राणाजगजितसिंह  पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, राजाभाऊ ओव्हाळ,  माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे , सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे, डॉ.राजू गायकवाड यांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या  रक्तदान शिबिरात दिवसभरात 66 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रतिष्ठानच्या वतीने चहा, फळे व नाष्टा देण्यात आला. 

  यावेळी जिल्हा रक्तपेढीच्या रक्तसंक्रमण कर्मचारी दिवसभर उपस्थित होते. हे रक्तदान शिबीर प्रसेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी सामाजिक नेते संदिप गायकवाड,निखिल बनसोडे, संदीप,निलेश भोसले,  अक्षय ( धोनी ) बनसोडे, अमोल बनसोडे. शंकर तलवारे. शाहू  धावारे,दादासाहेब मोटे, प्रसाद माने, लक्ष्मी ठाले,  रेणुका माने,  प्रजोत बनसोडे,  पृथ्वीराज सरवदे,  स्वप्नील बनसोडे, सुमित क्षीरसागर आदींनी  परिश्रम घेतले.

 

 
Top