उस्मानाबाद/ प्रतिनिधी:-

 सोलापूरच्या लोकमंगल फाऊंडेशनने येत्या 18 मार्च 2023रोजी उस्मानाबाद येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले असून इच्छुक वधू वरांनी या सोहळ्यासाठी आपली नावे नोंदवावीत असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी केले आहे.

 हा विवाह सोहळा उस्मानाबादच्या औरंगाबाद रोडवरील जिल्हा दूध संघासमोरच्या छायादीप मंगल कार्यालयामध्ये शनिवार दि.18 मार्च रोजी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी होणार आहे. या विवाह  सोहळ्यात सर्व धर्मांच्या वधूवरांना सहभागी होता येईल आणि त्यांचे विवाह त्यांच्या धर्मातील रिवाजानुसार लावले जातील. विवाह सोहळ्याचा पूर्ण खर्च लोकमंगल फाऊंडेशनतर्फे केला जाईल. 

  विवाहासाठी नाव नोंदणाऱ्या वधूचे वय किमान 18 वर्षे आणि वराचे वय किमान 21 वर्षे असले पाहिजे. त्यांना तसे प्रमाणपत्र नोंदणीच्या वेळी सादर करावे लागेल. वधूवराचे विवाहाचे कपडे,वऱ्हाडी मंडळीचे जेवण आणि मामाचा आहेर फाऊंडेशन देईल. वधू आणि वराचा मेकअप केला जाईल. वधूस मणी मंगळसूत्र व जोडवे दिली जातील.

  वधू वरांना ताट, वाटी, ग्लास प्रत्येकी पाच नग, बाळकृष्ण,  स्टीलचा हंडा, स्टील डबा, तांब्या आणि संसारोपयोगी अन्य काही भांडी व काही साहित्य  दिले जाईल. विवाह झालेल्या वधू वरांची शहरातून वरात काढली जाते. सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह करणारांसाठी शासनाकडून दिले जाणारे अनुदान मिळावे यासाठी लोकमंगलतर्फे प्रयत्न केले जातील.  अशीही माहिती  रोहन देशमुख यांनी केले आहे. 

नावे नोंदणीची अंतिम तारीख 10 मार्च 2023 ही असेल.

 इच्छुकांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.  रोहन देशमुख यांचे संपर्क कार्यालय, जुन्या बसस्टँडसमोर, आयसीआयसीआय बँकेच्या खाली, तुळजापूर व लोकमंगल मल्टीस्टेट शाखा आनंद नगर, पोलीस लाईन समोर उस्मानाबाद.

 विवाह नोंदणीसाठी आवश्यक असलेले फॉर्म आपल्या जवळच्या लोकमंगल मल्टीस्टेटच्या कोणत्याही शाखेत मिळतील.संपर्क 9923800256.

 
Top