उस्मानाबाद (प्रतिनिधी) :-

 ग्रामपंचायत निवडणुकांवरून उस्मानाबादेतलं वातावरण प्रचंड तापलंय. खासदार ओमराजे निंबाळकर  आणि जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे   तसेच एका गावातील ग्राम पंचायत निवडणुकीतील उमेदवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर उमेदवाराच्या घरावर अज्ञात व्यक्तीनं हे धमकीचं पत्र चिटकवलं आहे.

 अज्ञाताने या पत्रात लिहिलंय– ज्ञानेश्वर साळवे मदत कर. मतदानातून माघारी घे. शेवट पाठिंबा दे. नाही तर गावात राहायचं अवघड होईल. तुझा शाजदार ओम बाळ तुझा कलेक्टर व तुला नाही तर बघून घेऊ. वेळी आली तर संपवून टाकू. हितून तुझ्या आईला मतदान कोण करतय ते आम्ही बघत आहोत. मतदान केंद्रात कोण जातय बघताव… वेळ आली तर तुला पण कायमचं संपवून टाकू, तुझा खासदार बाळ अन् कलेक्टरलापण परिणाम भोगावे लागतील. लय दलित समाजावर उड्या मारतोय काय…..

 त्यानंतर आता या धमकीच्या पत्रातही ओमराजेंसाठी बाळ असा उल्लेख आलाय.

 मसला खुर्द या गावात सरपंच पदाची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. गावात स्थानिक विकास आघाडीचा सरपंच असून यात सर्वपक्षीय मंडळी आहेत. मसला गावच्या ग्रामपंचायतसाठी 11 जागांपैकी 7 जागा या बिनविरोध निघाल्या असून 4 जागेसाठी 18 तारखेला मतदान होत आहे. 4 जागेसाठी 2 स्थानिक पॅनलमध्ये लढत होत आहे. 2800 मतदार आहेत. सरपंचपदी रामेश्वर वैद्य हे बिनविरोध निवडून आहेत.

  राष्ट्रवादी किसान सेलचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर साळवे यांच्यासह त्यांची उमेदवार असलेली आई कांताबाई यांना ही धमकी आहे. अज्ञाताने लिहिलेल्या या पत्रामुळे गावात तसेच जिल्ह्यात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून त्वरीत कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा साळवे कुटुंबियांनी दिला आहे.

 
Top